अतुल परदेशी
मुख्य संपादक
०७ एप्रिल २०२२
पुणे
पुणे येथील प्रधान कार्यालयात २४ मार्च २०२२ रोजी महामित्र चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्याचा पदाधिकारी निवड कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्षपदी प्रविण प्रधान यांची निवड करण्यात आली असून सचिव पदी अमित पाटील व खजिनदारपदी निलेश गायकवाड यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी प्रवीण प्रधान तर सचिवपदी अमित पाटील यांची निवड
तसेच ११ सदस्यीय या संस्थेत उपाध्यक्ष श्री आप्पासाहेब चेडे, सह सचिव सुनिल राजगुरू, सह खजिनदार गुरुदेव गवंडी, कार्याध्यक्ष सुनिल जाधव, सल्लागार चंद्रशेखर गोसावी, तर रमेश भंडारी, सौ कंचन कांबळे व सुनिता काटम यांची सदस्यपदी निवड करण्यात आली तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून आकाश तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात सामाजिक कार्य या संस्थेद्वारे केले जात असून. सामाजिक क्षेत्रात ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ अशी भूमिका यावेळी संस्थेच्या सर्व सदस्यांनी घेतली. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचून जास्तीत जास्त समाजकार्य करण्याचा मानसही यावेळी केला व यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सदस्य नोदणी सुरु करण्यात आली आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news