१२ डिसेंबर २०२२
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच त्यांनी आपली भूमिका सविस्तर स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे राज्यभर मोठा वाद निर्माण झाला होता.याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या सर्व प्रकरणावर पत्र लिहालं आहे.
महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असं भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही! वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे!, असं एक प्रकारे स्पष्टीकरणपर पत्र कोश्यारींनी अमित शाहांना लिहिलं आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news