दि. २८/१२/२०२२
पिंपरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिकेची नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तब्बल २८६ कोटी ८३ लाख ७४ हजार ७०५ रुपये खर्चून ही इमारत बांधली जाणार आहे. ॲटो क्लस्टर समोरील भूखंडावर ही इमारत बांधली जाणार असून हे काम तीन वर्षात पूर्ण होणार आहे.
महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या नजीक असलेल्या आणि महिंद्रा कंपनीकडून आयटूआरअंतर्गत मिळालेल्या जागेत इमारत बांधण्याचा विचार सुरू होता. त्यानंतर ॲटो क्लस्टर समोर इमारत बांधण्याचे ठरविण्यात आले. तेथे १८ मजली पर्यावरणपूरक इमारत बांधण्याचा निर्णय झाला. त्या कामासाठी ३१२ कोटी २० लाख खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्या कामासाठी ५ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेडची ८.१९ टक्के कमी दराची आणि बी. जे. शिर्के कॅन्स्ट्रक्शनची ०.५० टक्के कमी दराची निविदा प्राप्त झाली. केएमव्हीचा २८६ कोटी ८३ लाख ७४ हजार ७०५ खर्चाच्या दरास आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे. इमारत बांधून झाल्यानंतर महापालिकेच्या सर्व विभागांचा कारभार तेथून चालणार आहे.
Your email address will not be published.

Article Tags:
news