महापालिका दवाखाने व रुग्णालयांत दर गुरुवारी मोफत गोवर लसीकरण

Written by

१७ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, शहरात सद्यःस्थितीत एकही रुग्ण आढळलेला नाही. दक्षता म्हणून लहान नऊ ते १६ महिन्यांच्या मुलांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. पाच वर्षापर्यंत मुलांना लस देता येते. दर गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या कालावधीत महापालिका दवाखाने व रुग्णालयांत मोफत लस उपलब्ध आहे. ज्या मुलांना लस दिलेली नसेल, त्या पालकांनी बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
ताप आणि अंगावर पुरळ उठणे, खोकला, सर्दी ,लालसर डोळे, अशक्तपणा,भूक न लागणे, अंगावर लाल पुरळ, लाल रॅशेस येतात ही गोवरची लक्षणे आहेत.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares