महाड एमआयडीसीत केमिकल कंपनीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू

Written by

१५ नोव्हेंबर २०२२
महाड एमआयडीसीमधील प्रसोल कंपनीमध्ये सोमवारी रात्री वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायुगळतीमध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघांना वायूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री उशिरा प्रसोल कंपनीमध्ये वायुगळतीची घटना घडली. या वायू गळतीमुळे एका कामगाराचा जागीच मृ्त्यू झाला. जितेंद्र आडे (वय वर्ष 40 राहणार वाळण बौद्धवाडी) असे मृत कामगारचे नाव आहे तर प्रशांत किंकले आणि मिलिंद मोरे हे गंभीर असीन त्याच्यावर महाडमधील देशमुख नर्सिंग होम येथे उपचार सुरु आहेत.दुर्घटनास्थळी पोलीस पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत या दुर्घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares