मतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयात विशेष शिबिर; एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी

Written by

०२ डिसेंबर २०२२
पुणे
पुणे जिल्ह्यात युवा नवमतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयांमध्ये एकाचवेळी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांमध्ये ३१ हजार ६४७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीत एकूण ७८ लाख ७६ हजार ९५० मतदार समाविष्ट आहेत. सध्या छायाचित्र मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु असून, आठ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यात १७ वर्षावरील भावी मतदारांची आणि १८ वर्षावरील पात्र युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युवा वर्गाला मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करुन मतदानाच्या हक्काविषयी जागरुक करण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघा अंतर्गत ४४२ महाविद्यालयांमध्ये मेगा शिबिर आयोजित करण्यात आले होते. नवमतदारांनी नमुना क्रमांक ६ चा अर्ज भरून शिबिरास चांगला प्रतिसाद दिला. अद्याप नोंदणी न झालेल्या नवमतदारांसाठी ५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व पात्र युवामतदारांना महाविद्यालयातील विशेष शिबिरात नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares