दि. ३१/१२/२०२२
आळंदी
आळंदी : आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मास्क वापरावा असे आवाहन आळंदी संस्थानतर्फे करण्यात आले आहे. तसे पत्रक प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
चीनसह जगातील अन्य काही देशात कोरोनाने पुनःआ एकदा डोके वर काढले आहे. नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. अगदी जिल्हाचे पातळीवरही कोरोनाचा धोका लक्षात घेऊन शासनयंत्रणेचे नियोजन सुरू झाले आहे. त्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी व मंदिर परिसरात गर्दी करू नये. वयोवृद्ध, लहानमुले तसेच आजारी व्यक्ती यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मंदिर व परिसरात सर्वांनी मास्क घालून प्रवेश करावा असे मंदिर प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
Your email address will not be published.

Article Tags:
news