१३ डिसेंबर २०२२
भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाची अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून पोलिसांची अतिरिक्त वाय+ सुरक्षा नाकारत असल्याचे कळविले.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना दि.०९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती.
मात्र, मंत्री महाजन यांनी अतिरिक्त वाय+ सुरक्षा नाकारल्याचे पत्राद्वारे राज्याचे पोलीस महासंचालक यांना कळविले आहे. या पत्रात महाजन यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा नेहमी तत्पर असते. मात्र सध्या राज्यातील पोलीस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता मला पुरवण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था काढून हटविण्याबाबतचे आदेश संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news