भारतीय पोस्ट खात्याच्या पुणे जिल्हा ग्रामीण च्या तक्रारींबाबत, दि. २३ जून २०२२ रोजी डाक अदालतिचे पुण्यात आयोजन : डाक अधीक्षक, पुणे ग्रामीण

Written by

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१६ जून २०२२
शिरूर
भारतीयांच्या जीवनाशी नाते असणारा शासकीय विभाग म्हणजे भारतीय डाक विभाग. या विभागाचे पुणे ग्रामीणचे अधीक्षक बी पी एरंडे यांनी नुकतीच एक जाहीर सुचना काढली असून, त्यात म्हटले आहे की पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषणामध्ये / पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दक तक्रार करण्याची वेळ येते.
ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यानुसार पुणे ग्रामीण विभागा अंतर्गत येणाऱ्या (पुणे शहर वगळून) पोस्ट ऑफिस संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी दि २३ जून २०२२ रोजी, दुपारी ०३.०० वा. ” पोस्टल डाक अदालत ” चे आयोजन अधीक्षक, डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर, पुणे ४११००५ यांच्या कार्यालयात करण्यात आले आहे. त्यामुळे, ज्या तक्रारींची सहा आठवड्यांमध्ये (स्पीड पोस्ट सोडून) दखल घेतली गेलेली नसेल, अशा प्रकारच्या तक्रारींचा यात समावेश होऊ शकेल.
एका तक्रार धारकाकडून एकच तक्रार लेखी स्वरूपात येणे आवश्यक आहे. विशेषतः टपाल वस्तू / मनी ऑर्डर / बचत बँक खाते / प्रमाणपत्र इ. बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली आहे त्याचे नाव व हुद्दा इ. ज्या तक्रारीची दखल पूर्वीच्या डाक अदालतद्वारे घेण्यात आलेली आहे, अशा तक्रारींचा भारत डाक अदालत मध्ये समावेश करता येणार नाही. या डाक अदालतीस उपस्थित राहण्यासाठी, दि. २३ जून २०२२ पर्यंत किंवा त्या आधी, वर दिलेल्या पत्त्यावर “तक्रार अर्ज” पाठविणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज आल्याशिवाय सहभाग घेता येणार नाही. ज्यांना प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही, त्यांच्या अर्जाचे उत्तर पोस्टाने लेखी स्वरूपात देण्यात येईल.” तरी शक्य असल्यास समक्ष हजर राहण्याचे आवाहन, पुणे ग्रामीण डाक विभागाने केलेले आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares