भारताचा नेदरलँड्सवर 56 धावांनी विजय

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२७ ऑक्टोबर २०२२
आज T20 विश्वचषक 2022 चा 23 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. आज कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सला 180 धावांचे लक्ष दिले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावा करू शकला. सुपर-१२ फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव केला.
भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. या विजयासह टीम इंडिया सुपर-१२ फेरीच्या ग्रुप-२ मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

Shares