भाजपाच्या नेत्यांकडून हे जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील तर; अंबादास दानवेंची शिंदे गटावर टीका

Written by

१६ नोव्हेंबर २०२२
अंबादास दानवे यांनी आज(बुधवार) पत्रकारपरिषदेत बोलताना शिंदे गटातील आमदरांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटातील आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत, या पार्श्वभूमीवर बोलताना दानवे यांनी शिंदे गटातील आमदारांना टोला लगावला आहे.
दानवे म्हणाले, मला असं वाटतं वीर सावरकर असो किंवा शिवसेनाप्रमुख असो यांचं हिंदुत्व भाजप जे शिवसेनेतून ४० गद्दार फुटले त्यांना सांगत असेल, तर मला वाटतं हेच हास्यास्पद आहे. तुम्ही ४० जण शिवसेनेत होता, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारं आहे. या देशात हिंदू म्हणून सन्मानाने जगायला, हिंदू म्हणून मतदान करायला जर कोणी शिकवलं असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. एवढं हिंदुत्वाचं आपल्याला बाळकडू मिळालेलं असताना, भाजपाच्या नेत्यांकडून हे जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील तर मला वाटतं यापेक्षा मोठं दुर्दैवं कोणतही नाही.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares