बोर्डाच्या परीक्षेसाठी घाई नको….
बारावीनंतरच्या होणाऱ्या सीईटी परीक्षा साठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बारावी प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) गुणांचा ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला आणताना सरकारने घाई करू नये, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या गुणांवरच द्यावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे सीईटीबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री थेट घोषणा कशी करू शकतात, असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
बारावीच्या गुणांना महत्त्व प्राप्त व्हावे, यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीचे ५० टक्के गुण व सीईटीचे ५० टक्के गुण विचारात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले. विद्यार्थ्यांनी बारावीकडे सीईटीइतकेच लक्ष द्यावे, , असे सामंत यांनी स्पष्ट केले. तांत्रिकदृष्ट्या ही बाब शक्य नसल्याचे शिक्षण तज्ज्ञ सांगत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या आधारे दिले जावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत बारावीच्या गुणांचा समावेश केला; तर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलल्यासारखे चित्र निर्माण होईल. त्यातून वादंग तयार होईल. या सगळ्या शक्यता टाळून सर्वसमावेशक निर्णय घेण्याची गरज असून, मंत्री महोदयांनी केवळ घोषणा करण्याऐवजी यावर विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द जाणून घ्या सत्य👇👇
या जिल्ह्यात बोर्डाची २२२ परीक्षा केंद्रे 👇👇
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारण्यात आला माहितेय ? 👇👇
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सीईटीबाबत वक्तव्य केल्याने यंदा बारावीला प्रविष्ट झालेले आणि पुढे सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या वर्षी बारावीचे विद्यार्थी सीईटीची जोमाने तयारी करत आहेत. बारावी परीक्षेच्या तोंडावर हे वक्तव्य करण्यात आल्याने विद्यार्थ्यांवर परीक्षेदरम्यान दबाव निर्माण होत आहे. यामुळे त्यांच्या परीक्षेवर परिणाम होईल, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यायचाच असेल; तर तो २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून घ्यावा, अशी मागणीही तज्ज्ञांकडून केली जात आहे.