२३ डिसेंबर २०२२
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. बोम्मई म्हणाले की, संजय राऊत हे देशद्रोही आहेत, संजय राऊत हे चीनचे दलाल आहेत. राऊत हे चीनच्या बाजूने आहेत. ते देशाची एकात्मता व अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जर अशीच वक्तव्य करत राहिले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे. चीनचे एजं’ म्हणणाऱ्या बोम्मईंना संजय राऊतांनी प्रत्त्युतर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, चीनने भारतात खुसखोरी केली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्रात घुसघोरी करते आहे, त्यामुळे आम्हालाही तोच मार्ग अवलंबावा लागेल असं मी म्हटले होते. जर बोम्मईंना चीनचा इतकाच तिटकारा असेल तर आधी तुम्ही तुमच्या पंतप्रधानांचा निषेध करा, त्यांनी चीनसाठी दरवाजे उघडले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वादात तेल ओतण्याचे काम बोम्मई करत आहेत. अमित शहांबरोबरच्या बैठकीत जे ठरलं होतं, ते मानायला बोम्मई तयारी नाहीत आणि आज ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढत आहे, आम्हाला त्यांनी संस्कृती आणि संस्कार सांगण्याची गरज नाही.
Your email address will not be published.

Article Tags:
news