०३ डिसेंबर २०२२
संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला बोल केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आहेत.आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीहून नवस करून आले. गुवाहाटीवरून आल्यानंतर मुख्यमंत्री परत गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला का जात नाही? सर्व मंत्री, आमदारांना घेऊन जा. बेळगाव महाराष्ट्रात आलंच पाहिजे. तिकडे जाऊन नवसाने सर्व गोष्टी घडत असेल तर नवस करून सर्व गोष्टी पदरात पाडून घेऊ शकतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
पण महाराष्ट्राचे प्रश्न राहिले बाजूला कर्नाटकाने आपल्या तलावात पाणी सोडलंय हे सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या घालत आहेत. याच नेभळटपणाविरोधात सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन टोला उद्धव ठाकरे यांनी केलं.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news