बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कॅग चौकशीच्या धरतीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची ही कॅग चौकशी करा – मारूती भापकर सामाजिक कार्यकर्ते

Written by

पिंपरी-चिंचवड
३१ ऑक्टोबर २०२२
मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपले मनपूर्वक अभिनंदन आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे रु.रु.१२००० कोटी रक्कमेच्या ७६ प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आपण विधिमंडळांमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे चौकशीची शिफारस कॅगकडे(Comptroller & Auditor General)केली. या चौकशीला तातडीने मंजूर मिळुन हि चौकशी होत आहे. या निर्णयाची मी मनापासून स्वागत करतो. आपण घेतलेल्या निर्णयाबाबत आपले अभिनंदन करतो.
अशाच प्रकारचे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागील पाच वर्षात झाले आहेत. त्यामुळे पुढील प्रकरणांची मुंबई महापालिकेप्रमाणेच तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची देखील कॅग(Comptroller & Auditor General) मार्फत सखोल चौकशी व्हावी.
१) पंतप्रधान आवास योजनेतील गैरव्यहार व भ्रष्टाचार.२) शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व मोशी डेपोपर्यंत वाहतूक करणे यातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार ३) ३१ मार्च २०१७ नंतरचे ठेकेदारांची बिले अडवून मुख्यमंत्र्यांची फसवणूक करुन र.रु३००कोटी रु. वाचवण्याचा खोटा दावा करून केलेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार.४) निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर अनुषंगिक कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.५) पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते विकासाच्या सव्वाचारशे कोटीच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.६) पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथील संत पिठाच्या निविदेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.७) संगणमत करून र. रु.५४कोटीच्या३६० निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.८) मोकाट व भटक्या कुत्र्यांवर संतती नियमन शस्त्रक्रिया कामात झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचार.९) अनाधिकृत जाहिरात फलक काढणे या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.१०) खाजगी केबल नेटवर्किंगच्या (रिलायन्स) रस्ते खोदाईच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.११) रस्ते साफसफाई यांत्रिकी पद्धतीने रोड स्लीपरच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.१२) भोसरी, आकुर्डी, थेरगाव, पिंपरी, रुग्णालय उभारणी व यंत्रसामुग्री खरेदीत झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार१३) वाय सी एम रुग्णालयातील खर्चाची यंत्रसामग्री खरेदी तसेच डॉक्टर व कर्मचारी भरती प्रकरणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.१४) शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.१५) आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त दिंडी प्रमुखांना देण्यात आलेल्या ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.१६) सन १९८२ते आज पर्यंत अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.१७) शिक्षण विभागामार्फत १६ शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यासाठी झालेला गैरव्यवहार भ्रष्टाचार.१८) पवना इंद्रायणी मुळा नदीतील जलपर्णी व कचरा काढण्याच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.१९)ऐन वेळचे विषय व वाढीव खर्च या नावाखाली झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार.२०) भोसरी रुग्णालयासाठी ऑक्सिजन गॅस पाईपलाईन निविदेतील भ्रष्टाचार.२१) भोसरी मोशी येथील कचरा डेपो मध्ये मुरूम पुरवण्याच्या कामातील भ्रष्टाचार.२२) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.२३) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा विभागाने विविध प्रकल्पांना पाणी एनओसी बंद प्रकरणातील भ्रष्टाचार.२४) चर्होली,मोशी,रावेत येथील बिल्डर अधिकारी नगरसेवकांच्या संगनमताने झालेला भ्रष्टाचार.२५) शहरातील ओला,सुखा,घातक कचरा जमा करण्यासाठी तीन कोटी रुपयांची डस्टबिन खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचार.२६) स्मार्ट सिटीच्या प्रकल्प व कामाच्या सर्वच निविदेत झालेला कोट्यावधीचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार.२७) टी.डी.आर व एफ.एस.आय. वाटपात झालेले गैरव्यवहार व भ्रष्टाचार.२८)२४बाय७ पाणी योजनेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.२९) वेस्ट एनर्जी प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.३०) जी.ई.एम व एम ए एच ए ई-टेंडर प्रणालीतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.३१) शहरातील पाच वर्षातील सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कामात झालेले गैरव्यवहार व भ्रष्टाचार.३२) बोगस एफ.डी श.आर.व बँक गॅरंटी प्रकरणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.३३)कै. रामकृष्ण प्रेक्षागृह नूतनीकरणाच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.३४) प्राधिकरण येथील कै. माडगूळकर प्रेक्षागृहाच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार.३५) यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई करण्याच्या र.रू.३६२कोटीचे कामाच्या निवेदेची चौकशी व्हावी.३६) नवीन महापालिका भवनाची र.रु.३१२ कोटी रक्कमेच्या निवेदेची चौकशी व्हावी.३७) स्मार्ट सिटी अमृत योजना पाणीपुरवठा आरोग्य स्थापत्य जलनिस्सारण पर्यावरण आदी विभागांच्या नेमलेल्या त्याच त्याच सल्लागारांची मुदत वाढ यामधून झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार.३८) स्पर्श घोटाळा, डॉक्टर अनिल रॉय प्रकरण, कचरा डेपो आग प्रकरण, कुत्र्यांची नसबंदी, वैद्यकीय विभागामार्फत डॉक्टर्स कर्मचारी नर्सेस सुरक्षा रक्षक नेमण्याची ठेके त्यातील बनावट कागदपत्रे यातून झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचार.३९) वेगवेगळ्या दोषी अधिकाऱ्यांवरील चौकशी अहवालांची फेर तपासणी व्हावी.४०) दक्षता व नियंत्रण विभागामार्फत झालेल्या चौकशी चौकशी व्हावी.४१) जलतरण तलाव नाट्यवरांचे खाजगीकरण या प्रकरणाची चौकशी व्हावी.४२) वाढीव खर्च थेट पद्धतीची कामे याची सखोल चौकशी व्हावी. ‌. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वरील विषयांमध्ये मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आपण ज्या तातडीने कॅगकडे शिफारस करून त्यास तातडीने मंजुरी घेऊन चौकशी सुरू केली आहे त्याच धर्तीवर वरील प्रकरणांची देखील कॅगच्या(Comptroller & Auditor General) माध्यमातून सखोल चौकशी व्हावी व यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही नम्र विनंती.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares