बुद्धविहार वर्धापनदिना निमित्त रविवारी देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल

Written by

पिंपरी : देहूरोड येथील बुद्धविहाराचा वर्धापनदिन रविवार २५ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. त्यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी निगडी आणि देहूरोड विभागातील वाहतुकीत तात्पुरता बदल केला आहे.
रविवारी पहाटे चार ते रात्री बारा या कालावधीत हा बदल अस्तित्वात राहणार आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सोमाटणेकडून निगडी-पुण्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सेंट्रल चौकातून पुढे जाण्यास मनाई आहे. या मार्गावरील वाहने सेंट्रल चौकातून उजवीकडे वळून देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाने इच्छित स्थळी जातील. पिंपरीकडून देहूरोडमार्गे मुंबईकडे जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकातून पुढे न जाता भक्तीशक्ती चौकाकडून डावीकडे वळून रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील. पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
देहूरोड बुध्दविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून येथून आणलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्यामुळे या बुद्धविहाराला अनन्यसाधारण महत्व आहे. या बुद्धविहाराच्या वर्धापनदिनी देशभरातील नागरिक बुद्ध विहाराला भेट देतात.
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares