दि. २९/१२/२०२२
पिंपरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 204 बालवाड्यांमध्ये शिकणाऱ्या ७ हजार ७०० विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार दिला जाणार आहे. यासाठी अंदाजे १३ कोटी ९१ हजार रुपये खर्च येणार आहे.
आधीच्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नवी ई निविदा काढण्यात आली. ती दोन वर्षांसाठी आहे. या निविदेनुसार बालवाडीतील बालकांना प्रति बालक ४ खजूर, 2 शेंगदाणा लाडू, 2 डिंक लाडू, 50 ग्रॅम वजनाचा 1 नाचणी बिस्कीटचा छोटा पुडा, 50 ग्रॅम वजनाचा 1 पारले बिस्कीटचा छोटा पुडा, 2 राजगिरा लाडू असा आहार दिला जाणार आहे. आठवड्यात प्रत्येक दिवशी कोणता आहार द्यायचा याचे नियोजन करण्यात आले आहे..
याबाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, या निविदेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर हा आहार देण्यास सुरुवात होईल.
Your email address will not be published.
Article Tags:
news