बापूसाहेब गावडे वि का से स सोसायटी, निमगाव दुडे च्या चेअरमन पदी शिवाजी घोडे सर व व्हाईस चेअरमन पदी शांताराम येवले यांची निवड

Written by

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१६ एप्रिल २०२२ 

शिरूर
शिरूर तालुक्यातील बेट भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या कुकडी व घोड नदी पाणलोट क्षेत्रातील एक महत्वाचे गाव म्हणजे निमगाव दुडे. सध्या हे गाव आंबेगाव विधानसभा मतदार संघात असुन, येथील निवडणुका सतत चर्चेचा विषय बनतात, कारण येथील निवडणूकांमधे खुप चुरस पाहायला मिळते. निमगाव दुडे येथील सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या होत्या. त्या देखील चुरशीच्या होऊन शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व, म्हणजे अकरा जागा मिळविलेल्या होत्या. तर प्रस्थापित पॅनलला जबरदस्त झटका देत, त्यांना खाते खोलण्याचीही संधी दिलेली नव्हती. या शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलचे नेतृत्व उद्योजक रामभाऊ गायकवाड, शिवाजी घोडे सर व राहुल घोडे सर यांनी केलेले होते. त्याचप्रमाणे सरपंच अश्विनी रामभाऊ गायकवाड, उपसरपंच प्रशांत पवार, माजी उपसरपंच अमोल घोडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पानगे, नवनाथ पानगे, दत्ता दुडे, विशाल रावडे, संदीप वागदरे, शहाजी पानगे, शहाजी पवार, संतोष खाडे, राजेंद्र दुडे, सुमित कांदळकर, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष विलास कांदळकर यांनी निवडणूकिदरम्यान अथक प्रयत्न केल्याचे चेअरमन शिवाजीराव घोडे सर यांनी सांगितले.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार, शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ सुभाष पोकळे, पुणे जी प चे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे, टाकळी हाजीचे आदर्श सरपंच दामू अण्णा घोडे, माजी सरपंच कानिफनाथ हिलाळ, चेअरमन बबन पोकळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी सौ ताराबाई म्हतु दुडे, फक्कड बबन दुडे, दिनेश नारायण पठारे, राजाराम कारभारी पानगे, हनुमंत म्हतु पानगे, सावकार गंगाराम बारहाते, बारकु मारुती रावडे, शांताराम ठकाजी येवले, तर महिला प्रतिनिधी रंगुबाई हरिभाऊ कांदळकर, पारुबाई धर्मनाथ येवले, तसेच विशेष मागास प्रवर्गातून शिवाजी सखाराम घोडे हे विजयी झाले होते. तर संजय बबन गायकवाड हे आधीच बिनविरोध निवडून आलेले होते.
सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन शिवाजी घोडे सर यांना राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिरूरचे आमदार अशोकबापू पवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक सहकार खात्याचे शिरूरचे सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक सहकारी अधिकारी पी बी पिसाळ यांनी पार पाडली. त्यांना सोसायटीचे सचिव राजेंद्र राजगुरू यांनी सहकार्य केले. निमगाव दुडे सोसायटीच्या निवडणूकुची सर्वत्रच चर्चा असुन, विरोधकांना धोबीपछाड केल्याने आता पुढील येत्या निवडणुकांमध्ये राजकारणाची समीकरणे बदलतात का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले असून सत्ताधाऱ्यांना हा धोक्याचा इशारा समजला जातोय.
टाकळी हाजीचे सरपंच दामूअण्णा घोडे व पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे यांनी या भागावर अधिक लक्ष वेधल्याचे दिसून येत असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares