रोहित खर्गे
विभागीय संपादक
२३ एप्रिल २०२२
बारामती
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मुंबईला बदली झाली आहे. सध्या ते सुट्टीवर होते मात्र परदेशातून आलेवर ही कडू बातमी समजल्यावर कमालीचे नाराज असल्याचे बोलले जाते. पिंपरी चिंचवड मधील त्यांचा कार्यकाळ संमिश्र असल्याचे बोलले जाते. त्यांनी जुगार, मटका, अवैध दारू गुत्ते यावर कठोर कारवाई केल्याने आणि माथाडीमधील चुकीच्या पद्धतीने काम करून औद्योगिक नगरीतील उद्योजकांना वेठीस धरणाऱ्या टोळ्यांना चाप लावला.
कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून केव्हा मटण वाले चाचा तर केव्हा वेगळी वेशभूषा करून गुन्ह्याची उकल केली. याची चर्चा राज्यभर गाजली. त्यांना मीडियाशी वेगळाच लगाव होता. शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणे आणि समाजोपयोगी कामात धडाडीने भाग घेत असे. एखादया कार्यक्रमात जरी सेलिब्रेटी असली तरी सेलिब्रिटीपेक्षा सेल्फी घेण्यासाठी घोळका यांच्या भोवती दिसत होता. अगदी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीही कार्यक्रमाच्या वेस्ततेमुळे घरी वेळेवर पोहचता येत नसे. त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांच्या दरबारात गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता सर्वसामान्य नागरिक कोणत्याही माध्यस्तीशिवाय त्यांच्यापर्यंत थेट पोहचत असे, आणि त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले. त्यामुळे ते गरिब आणि सर्वसामान्यांचे खूपच चाहते झाले होते. त्यांच्या बदलीने शहरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.
कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्याने सध्या ते नाराज आहेत. तीच नाराजी व्यक्त करण्यासाठी कृष्ण प्रकाश यांनी तडक शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कृष्ण प्रकाश आणि शरद पवार यंच्यात जवळपास ५ ते १० मिनिटे चर्चा झाली. भेट झाल्यानंतर कृष्ण प्रकाश यांना भेटीचे कारण विचारलं असता त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news