बच्चू कडू-रवी राणा वादावरून अनिल परब यांची प्रतिक्रिया

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. ‘धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारू’ असा इशारा रवी राणा यांनी बच्चू कडू यांना दिला आहे. त्यानंतर ‘कोणत्या चौकात थांबू’, असे प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी रवी राणांना दिलं आहे. यावर शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज ३ नोव्हेंबर मतदान पार पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बच्चू कडू आणि रवी राणांच्या वादावर विचारण्यात आले असता, या प्रकरणावर आम्ही बोलणं उचीत होणार नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असून, दोघे एकमेकांना बघून घेतील. दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे, आम्ही प्रेक्षक आहोत. लढतीचा आनंद आम्ही घेत आहे. या वादाला फोडणी कोण घालत आहे, हे तपासण्याची गरज आहे,अशी शंका त्यांनी उपस्थित केली.
 

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares