फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट मार्गावर लवकरच मेट्रोची होणार चाचणी

Written by

०२ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये पिंपरी स्थानक ते रेंजहिल्स स्थानक हा १२ किमीचा मार्ग उन्नत आहे . तर उर्वरित मार्ग भूमिगत आहे . या १२ किमी उन्नत मार्गाच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी सोमवारी दि . ३१ पूर्ण करण्यात आली . त्यामुळे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर लवकरच मेट्रोची चाचणी होणार आहे.
चाचणीनंतर फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक हा मार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला होईल, असा दावा महामेट्रो प्रशासनाने केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहिल्स स्थानक या १२.६४ किमी उन्नत मार्गासाठी एकूण ३९३४ सेगमेंट बनविण्यात आले होते या सेगमेंटद्वारे ४५१ स्पॅन उभारण्यात आले . तसेच १२. ६४ किमीचा उन्नत मार्ग बनविण्यात आला . नाशिक फाटा येथे कास्टिंग यार्डची उभारणी केली. ३९३४ . सेगमेंट ज्यामध्ये बनविण्यात आले . शेवटच्या टप्प्यात पिलर क्रमांक १४ ९ ते १५० मधील स्पॅनसाठी शेवटचा सेगमेंट उभारण्यात आला . अशाप्रकारे संपूर्ण १२. ६४ किमी उन्नत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares