पोस्ट विभागामार्फत शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

Written by

बायोस्फिअर्स, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुन्नर-आंबेगाव (उपविभाग मंचर), यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ फेब्रूवारी २०२२ रोजी, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे अनावरण, महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, श्रीमती जी. मधुमिता दास, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, बायोस्फिअर्स चे संस्थापक अध्यक्ष व पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जुन्नर-आंबेगाव चे (उपविभाग मंचर) उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे तसेच अनेक सन्माननीय शासकीय अधिकारी व शिवप्रेमी – पर्यावरणप्रेमी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाची पहिली प्रत, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्राच्या श्रीमती दास यांनी उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना सुपूर्त केली. सदर सचित्र पोस्टकार्ड संचाचे प्रस्तावक आणि संकल्पना डॉ. सचिन पुणेकर यांची आहे. सदर विशेष आवरणाच्या प्रस्तावाला पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग यांची अधिकृत मान्यता देखील मिळाली आहे.
सदर सचित्र पोस्ट कार्ड संचाच्या माध्यमातुन, जुन्नर तालुका आणि परिसरातील ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यावरणीय आणि अध्यात्मिक वारसा अधोरेखित केला आहे. परिसरातील हा समृद्ध वारसा जनमानसात रुजावा, त्याचे जतन, संवर्धन व्हावे आणि शाश्वत पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी आणि परिणामी स्थानिक लोकांची या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी, या हेतूने हा जुन्नरचा समृद्ध वारसा डाक विभागाच्या माध्यमातून व बायोस्फिअर्स संस्थेच्या पुढाकारातून, सर्वदूर करण्याचा प्रयत्न आहे. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासन व शिवप्रेमींच्या एकत्रित प्रयत्नातून, शिवरायांना एक अनोखे अभिवादन या निर्मितीच्या माध्यमातून केले आहे. या सचित्र पोस्टकार्डामुळे जनमानसांत, अभ्यासकांमध्ये विशेषत: जगभरातील टपाल उत्पादने संग्राहकांमध्ये, या शिवरायांच्या पवित्र जन्मभूमी व परिसरातील वारशाबाबत जनजागृती आणि कुतूहल निर्माण करण्याचे महत्वाचे काम होणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील अशा अनेक समृद्ध वारशांबाबत संवर्धन व संशोधनाकरिता या नूतन अभियानासारखी भविष्यात नक्कीच निर्मिती करता येवू शकेल. त्यासाठी हे सचित्र पोस्टकार्ड नक्कीच पथदर्शी ठरेल. हे शिवविचारांचे बीज मनोमनी रुजावे, आचरणात यावे यासाठी हा सुयत्न सफल होवो ही श्रींची इच्छा.
सदर उपक्रमाला मराठा सेवा संघाचे विविध पदाधिकारी, डाक विभागाचे पुणे ग्रामीणचे अधीक्षक बी.पी. एरंडे, सुकदेव मोरे, प्रमोद भोगडे तसेच शीवप्रेमी अविनाश शिळीमकर, गणेश मानकर, केदार कुलकर्णी, दत्तात्रय गायकवाड, शैलेंद्र पटेल, अभिजित भसाळे आणि इतर अनेक शिवभक्तांचे मौलिक सहकार्य लाभले.
शब्दांकन : (डॉ. सचिन अनिल पुणेकर) पर्यावरण अभ्यासक आणि संस्थापक अध्यक्ष, बायोस्फिअर्स [email protected]
जुन्नरचची रत्ने : १५ सचित्र पोस्टकार्डचा संच
१. किल्ले शिवनेरी (शिवजन्म स्थळ)
२. हटकेश्वर नैसर्गिक पुल
३. शिवसुमन
४. गुळंचवाडी नैसर्गिक शिलासेतू
५. किल्ले जीवधन, वांदरलिंगी सुलका
६. दुर्गावाडी देवराई
७. नाणेघाट परिसर
८. वडज धरण
९. कुकडेश्वर मंदिर
१०. शेकरू
११. भूत लेणी चैत्यगृह
१२. निलगिरी रान कबुतर
१३. लेण्याद्री गणेश मंदिर
१४. बिबट्या
१५. खोडद रेडीओ दुर्बीण

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares