पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात आम आदमी पार्टीचे निगडीत निषेध आंदोलन

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०८ एप्रिल २०२२
निगडी
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडरच्या दरवाढ विरोधात आज निगडी उड्डाणपूल खाली लोकमान्य टिळक पुतळ्या जवळ वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गेल्या एक वर्षात कोरोना महामारीमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या,उद्योग धंदे बंद पडले,कर्ज वाढला.अश्या या संकट समयी राज्य व केंद्र सरकारची प्राथमिकता लोकांला नोकऱ्या मिळवुन द्यायचे,उद्योग धंदे पुनर्वसन करण्याचे असले पाहिजे तर पेट्रोल,डिझेलचे दर वाढवून जनते वर अतिरिक्त भार टाकत आहे.जो पर्यंत पेट्रोल,डिझेल चे दर केंद्र सरकार कमी करत नाही तो पर्यंत आम आदमी पार्टी महागाई च्या विरोधात आंदोलन करत राहणार असे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनुप शर्मा यांनी बोलताना सांगितलं.

मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही. जनता मेटाकुटीला आलेली आहे. अनेकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे या सर्व गोष्टींना केंद्र सरकार व राज्य सरकार जबाबदार आहे असे प्रकाश हगवणे बोलताना म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्यातेलाचे दर कमी होत असताना केंद्र सरकार मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवत आहे. महाराष्ट्रात तर पेट्रोल शंभर रुपये लिटर पेक्षा जास्त महाग झाले आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत आहे. याची झळ सामान्य जनतेला बसत आहे. खाद्य तेलाचे दर ही गगनाला भिडले आहेत. सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले.

भाववाढीवर नियंत्रण मिळवले नाही, तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र आंदोलन पुढच्या काळात शहरभर करणार असल्याचे आपचे सामाजिक न्याय विंग अध्यक्ष वहाब शेख यांनी म्हटले. यावेळी अशोक तनपुरे, डॉक्टर अमर डोंगरे ,ब्रह्मानंद जाधव, नंदू नारंग,कपिल मोरे,चेतन बेंद्रे, प्रकाश हगवणे,आदी पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात सरकारचा निषेध केला या आंदोलनात आम आदमी पार्टीचे विजय अब्बाड ,चांद मुलाणी,सद्दाम पठाण, ब्रह्मानंद जाधव, स्वप्नील जेवळे, सरोज कदम,चांद मुलाणी,फैझल सय्यद,ओवैस शेख,अरबाज शेख,शिवा बोटे,विशाल जाधव,गणेश करडे,नागेश वाघमोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares