२१ डिसेंबर २०२२
पुणे
पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील स्वीटमार्टमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ तरुणांना अटक केली. सुरज ब्रह्मदेव मुंडे, असं आरोपीचं नाव असून एक आरोपी त्याचा साथीदार अल्पवयीन आहे.
पुण्यातील सिंहगड रस्ता असलेल्या जोधाराम चौधरी यांच्या फुलपरी स्वीट मार्टमध्ये सुरज ब्रह्मदेव मुंडे आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराने घुसून एक किलो काजू कतली फुकट मागितली. परंतु, फुकट काजू कतली देण्यास चौधरी यांनी नकार दिल्यानंतर चिडलेल्या सुरज आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्या जवळील पिस्तूल काढून चार वेळा त्यांच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढाला.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांनाही अटक केली.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news