२२ डिसेंबर २०२२
पुणे
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार,आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. गेल्याकाही वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली.अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. याच ठिकाणी त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ९.०० ते ११.०० वाजता केसरी वाडा येथे राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे ११.०० नंतर होणार आहे.
Your email address will not be published.
Article Tags:
news