१३ डिसेंबर २०२२
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी जोर धरु लागली. याच पार्श्वभुमीवर आज पुण्यात बंद पाळण्यात आला. डेक्कन जीमखाना ते लालमहाल असा मुक मोर्चाही यावेळी काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
यामध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले आहेत. पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे. पुण्यात पाळण्यात आलेला बंद आणि हा मुकमोर्चा बेकायदेशीर असल्याचं सांगत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केलीय. बंद बेकायदेशीर आहेत असं सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आला आहे. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरूय. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news