०९ डिसेंबर २०२२
पुणे
आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि आर ७ तरतुदीच्या अंतर्गत पुणे महापालिकेकडे असलेले १ हजार ८७ फ्लॅट विनावापर पडून आहेत. त्याचा आढावा घेण्यात आला असून, हे फ्लॅट दुरुस्ती करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आयुक्तांच्या मान्यतेनंतर या ठिकाणी कामे सुरू केली जाणार आहेत.
महापालिकेच्या विकास आराखड्यात ‘ईडब्ल्यूएस’ घरांसाठी आरक्षण टाकलेले असते. तसेच आर- ७ या नियमानुसार बांधकाम व्यावसायिक ठराविक फ्लॅट किंवा बांधकाम केलेले क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात देतात. ईडब्ल्यूएस आणि आर- ७ नुसार महापालिकेकडे एकूण ३ हजार ९०८ सदनिका ताब्यात आलेल्या आहेत. त्यापैकी १ हजार ९०४ सदनिकांचे वाटप झाल्या आहेत. विविध प्रकल्पांसाठी राखीव १३५, क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग केलेल्या सदनिका ४४८ आणि महामेट्रोकडे ३३४ सदनिका देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण २ हजार ८३१ सदनिकांचा वापर होत आहे. पण १ हजार ०८७ सदनिका पडून आहेत.
शहराच्या विविध भागात ही घरे आहेत, पण त्यांच्या सुरक्षेकडे कोणाचेही लक्ष नसल्याने या सदनिकांचे नुकसान होत आहे. त्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या सदनिकांमध्ये दुरुस्ती करून तेथे ठिकाणी रखवालदार आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक वेळ जागा पाहणी करणे बंधनकारक केले जाणार आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news