१३ डिसेंबर २०२२
पुणे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आज (ता.१३) विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून “पुणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. यादरम्यान शहरात कोणत्याही स्वरुपाची अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. विविध राजकीय पक्ष संघटना, पक्षांकडून पुकारलेल्या या बंदमध्ये अनेक सामाजिक, स्वयंसेवी संघटनाही सहभागी होणार आहे.
मोर्चा शहराच्या मध्यवर्ती भागातुन जाणार असल्याने पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. शहर पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्चाच्यावेळी आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे या मोर्चावर लक्ष आहे. याबरोबरच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याचीही पोलिसांकडून दक्षता घेण्यात आली आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news