पुणे, पिंपरी चिंचवड क्षेत्रात लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद राहणार?

Written by

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमधे 13 तारखेला मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीचा, पुणे कॅन्टेन्मेट आणि हवेली तालुक्यातील गावांचा यामधे समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेली तालुक्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?
– सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यावसाय करणारी व्यापारी दुकानं 14 जुलै ते 18 जुलैपर्यंत बंद राहतील. – त्यानंतर 19 जुले ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील. मात्र इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहतील. – विविध कंपन्यांकडून ऑनलाईन पोर्टलवरून मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा 14 जुलै पहाटे 1 वाजेपासून ते 23 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहतील. – सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे /मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळी व सायंकाळी फिरण्यासही प्रतिबंधीत राहील. – उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्ण बंद राहतील. – सलून/स्पा/ ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णत: बंद राहतील. – मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री 14 जुलै ते 18 जुलैपर्यंत बंद राहील. त्यानंतर दिनांक 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चालू राहतील.
पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन, अजित पवार यांचे आदेश

– सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा / आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी व दैनिक बाजार/ फेरीवाले हे सर्व ठिकाणे 14 जुलै ते 18 जुलैदरम्यान पूर्ण बंद राहतील. – त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत केवळ सर्व अत्यावश्यक किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा / आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते, दैनिक भाजी बाजार या कालावधीत सकाळी 08 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहतील. – शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहतील. – सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने- दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे-येणे व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर सुरु राहील. – शहरातील सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी बंद राहतील. – सर्व प्रकारचे बांधकाम /कंस्ट्रक्शनची कामे बंद राहतील तथापी ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरू ठेवता येईल. – सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह बंद राहतील. – सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ बंद राहतील. मात्र यापूर्वी परवानगी घेतलेले लग्न समारंभ 20 पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये आयोजित करता येतील. – सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना कार्यालये बंद राहतील. – धार्मिक स्थळें / सार्वजनिक प्रार्थनास्थळें बंद राहतील. – पुणे शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. – सामाजिक/ राजकीय/क्रीडा/ मनोरंजन / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम व सभा घेता येणार नाहीत.
Article Categories:
News · All News · Braking News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares