पिंपरी : पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण परिसरात यशदा रियालिटी ग्रुप, नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि किशान स्पोर्टस् इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये ५ किमी, १० किमी आणि २१ किमी यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील साधारण ३५०० मॅरेथॉनपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये २१ किमी गट (पुरुष) किरण गांडुळे, अनुराग कोनकर, अंकुश गुप्ता आणि (महिला) ऐश्वर्या खळदकर, समीक्षा खरे, शर्मिला कदम यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये १० किमी गट (पुरुष) अभिषेक देवकाते, प्रधान किरुळकर, मनोज मुंड आणि (महिला) ज्योती चव्हाण, प्रियांका चवारकर, वृषाली उत्तेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणी तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी आयोजक माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, उद्योजक वसंत काटे, शंतनू प्रभुणे, किरण काकुलथे, सुखदेव सिंग, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, चंद्रकांत नखाते आदी उपस्थित होते.
Your email address will not be published.

Article Tags:
news