कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२२ एप्रिल २०२२
पिंपळवंडी
पिंपळवंडी(ता. जुन्नर )येथील ग्रामदैवत मळगंगादेवीचा यात्रा उत्सवास शनिवार पासून सुरवात होणार आहे. या निमित्त शनिवारी चोळीपातळ व त्यानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर रविवारी पहाटे देवीचा अभिषेक त्यानंतर मांडवडहाळे दुपारी तिन ते पाच यावेळेत शेरणीवाटप होणार आहे त्यानंतर रात्री दहा वाजता छबीना मिरवणूक व त्यानंतर हरिभाऊ बडे सह शिवकन्या बडे यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे तर या यात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत असून रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या बैलगाडा शर्यतींना प्रारंभ होणार आहे.
या शर्यत मध्ये २०५ बैल गाडे धावणार असून बैलगाडा शर्यती साठी प्रथम क्रमांकास एक लाख रुपये द्वितीय क्रमांकास एकाहत्तर हजार रुपये तिस-या क्रमांकास एक्कावन्न हजार रुपये तर चौथ्या क्रमांकास एकतीस हजार रूपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर पहिल्या चार क्रमांकाच्या फळीफोड गाड्यांना तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत सोमवारी ( दि २५) सकाळी हजेरीचा कार्यक्रम व रात्री पडद्यावर पावनखिंड हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. अशी माहिती यात्रा कमिटी चे अध्यक्ष विवेक काकडे यांनी दिली यावेळी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news