पिंपरी पेंढार येथील राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचा आमदार चषक खुर्शिद मालेगाव संघाने पटकावला

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०३ मार्च २०२२
पिंपरी पेंढार
पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील एस. एम. चैतन्य स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित, स्व. सौ. कौसल्याताई जाधव मेमोरियल ट्रस्ट, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान व राहुलदादा जाधव युवा मंच प्रायोजित “आमदार चषक” राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत खुर्शीद, मालेगाव संघाने विजेतेपद पटकाविले. तर भारती विद्यापीठ, पुणे हा संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणाऱ्या २० संघानी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते अमितशेठ बेनके, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथशेठ लेंडे, शिवसेना नेते मंगेशअण्णा काकडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहूलशेठ जाधव, विवेक काकडे, सरपंच सुरेखाताई वेठेकर, सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन रामदासशेठ वेठेकर, यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच अमोल वंडेकर, माजी उपसरपंच किसन कुटे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. असोसिएशनतर्फे देण्यात येणारा “चैतन्य पुरस्कार” सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते भाऊशेठ गांधी, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका हिराबाई खोंड, युवा उद्योजक प्रकाशशेठ वेठेकर यांना प्रदान करण्यात आले. पिंपरी पेंढार येथील सोशल युथ फाऊंडेशनचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेमधील विजयी संघांना माजी सरपंच रोहिदास वेठेकर, सोशल युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विमलेशशेठ गांधी, कौसल्याताई जाधव मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष गणेशशेठ जाधव, अमोल वेठेकर, असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष दत्तात्रय वेठेकर यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेत पंच म्हणून के. डी. वाघमारे. चंद्रकांत नगरे, राजेश सोडळ, अस्लम मोमीन यांनी काम पाहिले. प्रास्ताविक जनार्धन कुटे यांनी तर सुत्रसंचालन अरविंद कुटे यांनी, समालोचन अमोल कुटे यांनी केले. रोहित खर्गे यांनी आभार मानले. गुणलेखक म्हणून वसंत शेटे, अविनाश जाधव, केशव पठारे, सचिन वेठेकर यांनी तर रेषा पंच शुभम थिटे, गोट्या मिंढे. शिवम कुटे, सिद्धेश घाडगे, विनोद डुंबरे, अतुल पडवळ यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जनार्दन कुटे, अकील मोमीन, मोसिम सय्यद, गोविंद चव्हाण, किरण देवगिरे, विनय कुटे, अनिकेत जोरी, हरि जाधव यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक : खुर्शीद मालेगाव.
द्वितीय क्रमांक : भारती विद्यापीठ, पुणे,
तृतीय क्रमांक : नवजीवन, मालेगाव.
चतुर्थ क्रमांक : औरंगाबाद शहर पोलीस,
पाचवा क्रमांक : इकबाल, मालेगाव,
सहावा क्रमांक : जयंत खंडागळे, सोलापूर,
सातवा क्रमांक : छत्रपती मोहोळ, सोलापूर,
आठवा क्रमांक : डी. आर. पी. औरंगाबाद.
वैयक्तिक बक्षिसे : उत्कृष्ट शूटर – खुर्शीद अन्सारी, उत्कृष्ट स्कूपर नितीन काकडे, उत्कृष्ट नेटमन – गौरक्ष वाकचौरे, उत्कृष्ट सर्व्हीसमन – विठ्ठल दुरगुडे.

 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares