पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांचे ९० टक्के काम पूर्ण

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०५ मे २०२२
पिंपरी
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत शेवटच्या टप्प्यात निवड होवूनही पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने कामाचा अव्वल दर्जा राखला आहे. पॅन सिटी आणि एबीडी या प्रकारात सुरु असलेली अनेक कामे पूर्णत्वावर आले असून आतापर्यंत या दोन्ही प्रकल्पांचे काम ९० टक्के पर्यंत पूर्ण झालेले आहे. या कामगीरीच्या जोरावर पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गंत सद्यस्थितीत देशात ११ नंबर प्राप्त केला आहे, अशी माहिती आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली. स्मार्ट सिटी प्रकल्प कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मा. आयुक्त्‍ यांच्या दालनात शहर सल्लागार समिती बैठकीत पार पडली, यावेळी ते बोलत होते. स्मार्ट सिटी योजना कालावधी सर्व कामे पूर्ण करून सदरचे प्रकल्प शहरातील नागरिकांसाठी खुली करण्यात येतील, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
शहर सल्लागार समिती बैठकीत आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांची माहिती
यावेळी, पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे, आयुक्त राजेश पाटील, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार, निमंत्रित सदस्य गोविंद पानसरे, कार्यकारी अभियंता मनोज सेठीय, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, विद्यार्थी प्रतिनिधी दिपक पवार, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीला मिळालेल्या केंद्र व राज्यस्तरीय “प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना”, ‘ओपन डेटा वीक’ “प्लेस मेकींग” या प्रकारात ७५ तासांत तयार करण्यात आलेल्या सुदर्शन चौकातील “८ टू ८० पार्क” ला प्लेस मेकींग मॅरेथॉन विजेता पुरस्कार, ऊर्जा आणि हरित इमारती, शहरी नियोजन, हरित आवरण आणि जैवविविधता, गतिशीलता आणि हवेची गुणवत्ता, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन या पाच श्रेणींत “क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क २.०” मध्ये ५ पैकी ४ स्टार मिळवून पर्यावरण संतुलन राखण्यात मोलाची कामगीरी केल्याबददल “क्लायमेट चेंज” पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबददल उपस्थित मान्यवरांनी आयुक्त्‍ व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. तसेच, शहरासाठी राबविलेल्या विविध नवकल्पनांबाबत कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच, पॅन सिटी व एबीडी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत सल्लागारांमार्फत सादरीकरण करण्यात आले.
महापालिका व स्मार्ट सिटी उपक्रमांना मिळालेल्या विविध पुरस्कारांबददल लोकप्रतिनिधींकडून कौतुकाचा वर्षाव
यामध्ये, स्मार्ट सारथी ऍपच्या माध्यमातून १ लाख ८५ हजार नागरिकांपर्यंत पोहोचता आले आहे. तसेच, विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे कॅम्पनींग सुरु आहे. मर्चंड मोडयुल ऍपद्वारे शहरातील छोटया व्यापा-यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्युनिसीपल ई-क्लासचे २३ पैकी २१ कंम्पोनंट पूर्ण असून ८० टक्के काम झालेले आहे. डोर टू डोर सर्व्हे सुरु आहे. आयसीसीसीचे काम प्रगतीपथावर आहे. एबीडी प्रकल्पांतर्गंत रस्त्यांचे ८५ टक्के काम मार्गी लागले आहे. स्मार्ट बस स्टॉप उभारले जात आहेत. स्मार्ट पार्कींग व्यवस्था, सिनिअर सिटीझन प्लाझा, योगा पार्कची कामे देखील प्रगतीवर आहेत. व्हीएमडीपासून तीन लाखाचे उत्पन्न स्मार्ट सिटीला मिळाले आहे. ऑप्टीकल फायबर केबल ५८५ पैकी ५३७ किमी टाकण्यात आली असून या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. २७० ठिकाणी वायफाय बसविण्यात आले आहे. पोल उभारण्याचे काम ९० टक्के झाले आहे. सिटी सर्व्हेलन्स अंतर्गत शहरात नेमून दिलेल्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. स्मार्ट ट्राफिकचे १२२ कॅमेरे बसविले आहे. स्मार्ट पर्यावरण मशीन, स्मार्ट वॉटर मीटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट आदी स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या प्रकल्पाची कामे वेगाने सुरु असल्याची माहिती यावेळी सल्लागार प्रतिनिधींनी दिली.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares