पिंपरी चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले पोलिसांच्या ताब्यात.

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०४ मे २०२२
निगडी
सध्या सुरू असलेले राज ठाकरे यांचे भोंगा प्रकरण तापायला सुरवात झाली आहे त्याचे पडसाद राज्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातही पाहायला मिळत आहे. मनसेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले यांना शहरातील कायदा व सुवेवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी निगडी येथून घरातून ताब्यात घेतले असल्याचे समजते. कालही चिखले यांना पोलिसांनी नोटीस देऊन देहूरोड येथे नजरकैदेत ठेवल्याचे समजले. आज सकाळीच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सकाळीच निगडी येथून सचिन चिखले यांना ताब्यात घेतल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

आता शहरातील कोणाकोणाला पोलीस ताब्यात घेणार याची उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसते. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस योग्य ती खबरदारी घेत असल्याचे समजते. सकाळी पोलीस  चिखले यांच्या घरी आले. पोलिसांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली एक नोटीस हातात दिले आणि पोलीस त्यांना घेऊन गेले असे त्यांचे कार्यकर्ते राहुल काळभोर यांनी आपला आवाजकडे बोलताना सांगितले. त्यांच्या बरोबर शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी, प्रतीक शिंदे, रोहिदास शिवणेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. चिखले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही.

 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares