पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ जून २०२२
पिंपरी
शौर्य, पराक्रम  आणि धाडसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रतापसिंह यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले आहे असे प्रतिपादन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांची  जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.  पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
निगडी चौक येथील महाराणा प्रतापसिंह  यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहशहर अभियंता संजय खाबडे, विजयकुमार काळे, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे, उद्यान सहाय्यक नंदकुमार ढवळसकर, मनसे गटनेते सचिन चिखले, पिंपरी चिंचवड राजपूत संघटनेचे पदाधिकारी शिवकुमार बायस, प्रवीण राजपूत, श्रीराम परदेशी जगताप, ललित पवार, जितेंद्र पाटील, अशोक अप्पा, किरण परदेशी, संदिप कवडे  यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, महाराणा प्रताप हे धाडसी व पराक्रमी योद्धे  होते.  त्यांच्या शौर्याच्या कथा नवीन पिढीसाठी स्फूर्तीदायक ठरतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम परदेशी यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares