पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१३ मे २०२२
पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. १२) मंजुरी दिली असून अंतिम आराखडाही जाहीर झाला आहे. प्रारुप रचनेमध्ये तब्बल ५ हजार ६८४ हरकती व सूचनांचा पाऊस पडल्यानंतरही केवळ मोजके बदल करण्यात आले असून बदलांसह अंतिम आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच मुख्य इमारतीत आणि आठही प्रभागात प्रसिद्ध करण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले. यामुळे इच्छुकांना नेमक्या कोणत्या परिसरात निवडणूक लढावयची आहे, हे स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळताच महापालिकेच्या निवडणूक विभागाने हा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. प्रारुप आरखड्यामध्ये प्रभागप्रभाग क्रमांक २ , ३, ५, ७, ११, १२, २६ आणि २७ मध्ये बदल करण्यात आले आहेत. बदलानुसार काही भाग जोडून शेजारच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झाला आहे. हे किरकोळ बदल वगळता इतर कोणत्याही प्रभागात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
५ हजार ६८४ हरकती व सूचनांवर २५ फेब्रुवारीला प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्यासमोर सुनावणी झाली.
महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात तीन सदस्यांचे ४५ व चार सदस्यांचा एक असे एकूण ४६ प्रभाग आहेत. एकूण १३९ नगरसेवकांची संख्या असणार आहे. त्या आराखड्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या. ५ हजार ६८४ हरकती व सूचनांवर २५ फेब्रुवारीला प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला. मात्र, दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने राज्य सरकारने विधीमंडळात कायदा पारित करून प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले. मात्र, या कायद्याच्या विरोधात १३ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकांवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले.
महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभागरचनेच्या अंतिम आराखडा निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांच्यासमोर गुरुवारी सादर केला. त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून, त्यास गुरुवारी मंजुरी दिली आहे.
चौकट
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने आज जरी मंजुरी दिली असली तरी निवडणूका ह्या पावसाळ्या नंतरच व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज सादर केला आहे त्यावर येत्या मंगळवार सुनावणी होणार आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares