पिंपरी-चिंचवड परिसरातील शिधा दुकानांमधील इ-पॉस यंत्राला नेटवर्क समस्या

Written by

२९ ऑक्टोबर २०२२
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड परसिरातील शिधा दुकानांमधील इ-पॉस यंत्रांमधील नेटवर्कच्या समस्येमुळे यंत्रावर शिधापत्रिका धारकाच्या नोंदणीस पंचवीस ते तीस मिनिटांचा वेळ लागत आहे. त्यामुळे शिधा दुकानांसमोर शिधा घेण्यासाठी नागरिकांच्या लांब रांगा लागत आहेत. शिधा घेण्यासाठी तीन-चार खेपा शिधा दुकानात माराव्या लागत असल्याने शिधा पत्रिका धारक आणि दुकानदार यांच्यामध्ये बाचाबाचीही होत आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी शिधा पत्रिका धारक आणि शिधा दुकानदारांमधून होत आहे.
इ-पॉस यंत्रामध्ये नेटवर्कची समस्या सुरू झाली आहे. त्यामुळे एका शिधा पत्रिका धारकाची नोंद इ-पॉस यंत्रात करण्यासाठी अर्ध्या तासापर्यंतचा वेळ लागत आहे. त्यामुळे शिधा दुकानांसमोर शिधा पत्रिका धारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आक्टोबर महिन्यात वेळेत शिधा न घेतल्यास आक्टोबरची शिधा बुडण्याची भितीही काही शिधा पत्रिका धारकांनी बोलून दाखविली आहे.
 
Your email a

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares