पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज स्वीकारला पदभार

Written by

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२१ एप्रिल २०२२
पिंपरी-चिंचवड
बुधवारी उशीरा रात्री राज्याच्या गृहविभागामार्फत बदलीचे आदेश निघाले.यात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नेमणूक करण्यात आली.त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी अंकुश शिंदे यांनी आयुक्तालयात हजेरी लावत अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची व्ही. आय. पी सुरक्षा, विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुबईत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या बदलीचे कारण अनेक जरी असले तरी राजकारणातील पांढरे बगळे आणि त्यांची दहशत मोडून काढत गुन्हेगारी विश्‍वातील कर्दनकाळ अशी त्यांची ओळख होती.अल्पावधीतच आपल्या मिस्टर क्लीन या कामाच्या पद्धतीमुळे कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात आपला दबदबा निर्माण करत सर्वसामान्यांमध्ये विश्‍वास निर्माण केला.
कृष्ण प्रकाश यांनी राजकारणी,उद्योगपती, बिल्डर यांना कधीच अधीकचा वेळ दिला नाही उलट सर्व सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या कार्यालयाची दार कायम उघडी असायची आणि ते विषय समजून घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याची नेहमीच पुढाकारही घेत असत.कृष्ण प्रकाश यांची बदली कोणत्या कारणांमुळे झाली यापेक्षा त्यांनी मागील १८ महिन्यांच्या काळात काय काम केले याचा आढावा घेतला तर त्यांच्या कामाचे अनेक पैलू समोर येतील.असो पोलीस आयुक्ता कृष्ण प्रकाश यांच्या जागेवर नियुक्त झालेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यापूर्वी विशेष महानिरीक्षक, सुधार सेवा मुंबई येथे सेवा बजावत मुरब्बी ते प्रसिद्धी झोतापासून लांब राहणारे अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी योग्य कारवाई करण्यास अंकुश शिंदे कुचराई करत नाहीत. दरम्यान माध्यमांपासून लांब राहणा-या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्याचे टाळले आणि केवळ पत्रकार बंन्धूची ओळख करून घेत काम काज हाती घेतले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares