पालिका शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

Written by

०२ डिसेंबर २०२२
पिंपरी
महापालिका व स्मार्ट सिटीच्या ई – क्लासरुम प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या १०० शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण दिले . शाळांच्या मागणीनुसार १२ वर्गांद्वारे ३५० शिक्षकांनी डिजिटल कॉन्टेंट , कॉम्प्युटर लॅब ऑपरेटिंग , स्टीम लॅब ( विज्ञान , तंत्रज्ञान , अभियांत्रिकी आणि गणित ) , रोबोटिक लॅब आणि कॅमेरे सुरू करण्याबाबत प्रशिक्षण घेतले . ई – क्लासरूम प्रकल्प महापालिकेच्या १२३ शाळांमध्ये दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे . पहिल्या टप्प्यात ११ शाळांमध्ये प्राथमिक तत्त्वावर अंमलबजावणी केली होती . दुसऱ्या टप्प्याचे कामकाज ११२ शाळांमध्ये पूर्ण झाले आहे.
प्रकल्पामध्ये संगणक कक्ष , डिजिटल ई – लर्निंग प्लॅटफॉर्म , वायफाय एक्सेस पॉईंट , एलईडी डिस्प्ले , एचडी कॅमेरा , व्हिडिओ रेकॉर्डिंग , शैक्षणिक विश्लेषण सॉफ्टवेअर , रोबोटिक्स लॅब ( विज्ञान तंत्रज्ञान , अभियांत्रिकी , गणित ) , गणित , इंग्रजी आणि विज्ञानासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती , प्रकल्प व्यवस्थापन आणि हेल्प डेस्क सेवा , ऑनलाइन डॅशबोर्ड आदी घटकांचा समावेश आहे . प्रकल्पांतर्गत एक हजार वर्ग खोल्यांमध्ये एलईडी डिस्प्ले , संगणक , कॅमेरे बसवले आहेत . प्रशासक शेखर सिंह यांच्या सूचनांनुसार प्रदीप जांभळे , संदीप खोत , किरणराज यादव , मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares