पाणीपुरवठा करण्यासाठी मजुरांचा वर्षाचा खर्च चार कोटी 78 लाख

Written by

१६ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी मजूर पुरविण्यासाठी एकूण 4 कोटी 78 लाख रुपये खर्चासह एकूण 8 कोटी 42 लाख खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.15) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली. सभेला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उल्हास जगताप तसेच, विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
सन 2022-23 करिता सांगवी आणि नवी सांगवी जलक्षेत्राचे परिचालन करण्यासाठी 57 लाख रुपये खर्च आहे. सन 2022-23 करिता पिंपळे निलख गावठाण, रहाटणी सर्व्हे क्रमांक 20 टाकी, ताथवडे, पुनावळे, काळाखडक टाकी, लक्ष्मणनगर व गणेशनगर टाकी, वाकड, भगवाननगर टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्र तसेच, दत्तनगर जलक्षेत्रातील वितरण व्यवस्थेचे परिचलन करण्यासाठी मजूर पुरविण्यात येणार आहेत. यासाठी 3 कोटी 4 लाख रुपये खर्च आहे. सन 2022-23 करिता प्रभाग क्रमांक 20 व 30 मधील संत तुकारामनगर व कासारवाडी जलक्षेत्राचे परिचालन करण्यासाठी 57 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
सन 2022-23 करिता दापोडी जलक्षेत्राचे परिचालन करण्यासाठी 60 लाख रुपये खर्च होणार आहेत. असे एकूण 4 कोटी 78 खर्च होणार आहे. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली. थेरगावातील पवारनगर क्रमांक 2 ते प्रसूनधाम सोसायटी या रस्त्यामध्ये येणारा अति उच्चदाब (इएचव्ही) टॉवर हलविण्यात येणार आहे. यासाठी 81 लाख खर्च अपेक्षित आहे. सन 2022-23 करिता प्रभाग क्र. 17 मधील महापालिकेच्या शाळेच्या इमारतींची स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी 23 लाख रुपये खर्च होतील. या खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
 
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares