पाच लाख ८६९८ पैकी २ लाख ६५ हजार जणांनी भरला मिळकतकर

Written by

०७ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील लाख ८६ हजार ५ ९ ८ व बिगरनिवासी मिळकतधारकांपैकी गेल्या सात हजार मिळकतकर महिन्यांत केवळ २ लाख ६५ नागरिकांनी भरला आहे . आतापर्यंत एकूण ४२० कोटींचा कर भरणा झाला आहे . पुढील पाच महिन्यांत तब्बल ७८० कोटींच्या वसुलीचे टार्गेट महापालिकेच्या कर संकलन विभागासमोर आहे . ते टार्गेट पूर्ण होणार की नाही ते मार्च २०२३ मध्ये स्पष्ट होईल . ५ निवासी २०२२ एक एप्रिल ते ५ ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत पालिकेस एकूण ४२० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे . त्यात ऑलनाइन माध्यमातून १ लाख ७३ हजार ३०० नागरिकांनी सर्वाधिक २३० कोटी ८२ लाखांचा भरणा केला आहे . तर , आरटीजीएसने ३ ९ ० जणांनी ३२ कोटी ६५ लाखांची बिले भरली आहेत.
रोखीने ५२ हजार ७६२ नागरिकांनी एकूण ४५ कोटी ६५ लाख आणि धनादेशाद्वारे १३ हजार ५६२ जणांनी एकूण ६४ कोटी २ ९ लाखांची बिले भरली आहेत . तर , डीडीद्वारे ६८२ जणांनी २४ कोटी ३१ लाख रूपये भरले आहेत . आतापर्यंत ३ लाख २१ हजार ५ ९ ८ नागरिकांनी कर भरलेला नाही . कर संकलन विभागाचे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १ हजार २०० कोटींचे उत्पन्न जमा करण्याचे टार्गेट आहे . आर्थिक वर्षातील ७ महिन्यांत केवळ ४२० कोटींची बिले जमा झाली आहेत . येत्या ३१ मार्च २०२३ पर्यंत म्हणजे ५ महिन्यांत तब्बल ७८० कोटींची वसुली करण्याचे आव्हान कर संकलन विभागासमोर आहे . त्यासाठी कर संकलन विभागाने ५० हजारांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या मिळकतींची कारवाई मोहिम तीव्र जप्तीची केली आहे . त्यासाठी पोलिसांसह तृतीयपंथीयांचे सहाय घेण्यात येत आहे .
मोठ्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत , असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर संकलन विभागीय कार्यालयांची संख्या : १७, ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वसुली : सांगवी , पालिका भवन किवळे , दिघी – बोपखेल व वाकड वसुलीचे प्रमाण कमी : निगडी – प्राधिकरण , आकुर्डी , चिंचवड , थेरगाव , पिंपरी गाव , पिंपरी कॅम्प , फुगेवाडी – दापोडी , भोसरी , चोली , मोशी , चिखली , तळवडे.
 

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares