पाच भजनी मंडळांना जिल्हा परिषदे अंतर्गत भजन साहित्य वाटप

Written by

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१६ मे २०२२
निमगाव सावा
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नातून पाच भजनी मंडळांना सुमारे २ लक्ष रुपयांचे भजनात साहित्य वाटप निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे भजनी मंडळांना करण्यात आले.
या मध्ये स्वयंभू मोरया प्रासादिक भजनी मंडळ शिरोलीवाट,वरदविनायक प्रासादिक भजनी मंडळ बागवाडी / मतेमळा,श्रीराम प्रासादिक भजनी मंडळ शिवमळा,श्री.विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ गावठाण, श्री मोरया प्रासादिक भजनी मंडळ खराडी या पाच भजनी मंडळाचा समावेश होता. या वेळी हभप विजय महाराज खाडे व भजनी मंडळांनी पांडुरंग पवार यांचे आभार मानले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, हभप विजय महाराज खाडे, किशोर घोडे, इब्रहिम पटेल, रामदास गाडगे,नामदेव खाडे, तान्हाजी गाडगे,वारकरी सांप्रदायातील जेष्ठ मंडळी आदी उपस्थित होते.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares