पाचवी-आठवीची पुढील वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला

Written by

१७ नोव्हेंबर २०२२
पिंपरी

पाचवी-आठवीची पुढील वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला होणार आहे. परीक्षा परिषदेकडून परीक्षेच्या प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, 15 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाचवी व आठवीला प्रवेश घेतलेल्या सरकारी, अनुदानित, खासगी, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.
दोन्ही इयत्तांसाठी चार पेपर असून, प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा चार विषयांची मिळून परीक्षा होणार आहे. ‘पेपर क्रमांक एक मध्ये प्रथम भाषा 50 गुण, तर गणित 100 गुण अशा एकूण 150 गुणांचा पेपर असणार आहे. ‘पेपर क्रमांक दोन’मध्ये तृतीय भाषा 50 गुण आणि बुद्धीमत्ता चाचणी 100 गुणांसाठी असणार आहे. एकूण तीनशे गुणांची होणारी ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीची (एमसीक्यू) असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असून, त्यातील एका अचूक पर्यायाची निवड विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. परीक्षेसाठी सेमी इंग्रजी माध्यमाची निवड करण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांसाठी खुला ठेवण्यात आला असून, जे विद्यार्थी या माध्यमाची निवड करतील, अशा विद्यार्थ्यांना गणित व बुद्धीमत्ता चाचणीची प्रश्नपत्रिका इंग्रजीतून मिळेल, असे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती प्रक्रियेचे वेळापत्रक – 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2023,
अर्ज करण्याची मुभा – 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2023,
विलंब शुल्क भरून अर्ज करण्याची मुभा – 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023
परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023
परीक्षेचे वेळापत्रक – 
इयत्ता पाचवी 12 फेब्रुवारी स. 11 ते 12.30 (पेपर एक), स. 11 ते 12.30(पेपर दोन)
इयत्ता आठवी 12 फेब्रुवारी दु. 2 ते 3.30 (पेपर एक),  दु. 02 ते 3.30 (पेपर दोन)
 
 
 

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares