१६ डिसेंबर २०२२
पक्षाने आदेश दिले तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. मात्र माझा राजीनामा घेण्या आधी तुम्ही राज्यपालांचा राजीनामा घेणार का, असा सवाल त्यांनी आरोप करणार्यांना विचारलाय. राजकीय सुडापोटी माझ्यावर आरोप केला जातोय. माझ्यामागे ईडी लावता येत नाही, म्हणून धार्मिक वाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय.
सुषमा अंधारे यांनी पूर्वी हिंदू देवी-देवता तसे साधु संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अंधारे यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मी अशी वक्तव्ये करत नाही. आधी मी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली होती.
तरीही सुषमा अंधारे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी होत आहे. वारकरी संप्रदायातून उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली जात आहे. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जातात, मग हे लोक मधले १० ते १५ वर्ष हे कुठे गेले होते? माझ्यासाठी माझा पक्ष महत्त्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचं असेल तर मी कुठूनही करू शकते. मी जर पक्षाबाहेरून काम केलं तर भाजपसाठी पळता भुई थोडी करेन. स्वयंघोषित कीर्तनकार भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मागणार आहेत का? मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा मागणार आहेत का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news