नोटरी वकिलांवर भा. दं. वि. कलम 420 नुसार गुन्हे दाखल करू नयेत; वकिलांची मागणी

Written by

दि. २०/०१/२०२३
पिंपरी
पिंपरी :  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये प्रतिज्ञापत्र करारनामा व इतर कागदपत्रे नियमानुसार नोटरी करीत असतात. या नोटरींवर भादवी कलम 420 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता काही ठिकाणी असे गुन्हे दाखल झालेले आहेत. नोटरी वकीलांवर अशा संदर्भात गुन्हे दाखल करताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय गुन्हे दाखल अथवा अटक करण्यात येऊ नये अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील वकिलांच्यावतीने करण्यात आली आहे.
या बाबत वकिलांच्या संघटनेने पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारचे नोटरी वकील कागदपत्रे तसेच प्रतिज्ञापत्र करारनामा व इतर कागदपत्रे नियमानुसार नोटरी करीत असतात. सदरचे नोटरी करीत असताना विधी व न्याय विभागाच्या नोटरी विभागाने नेमून दिलेल्या नियमानुसार काम करीत असतात. सदरचे नोटरी करीत असताना नोटरी वकिलांना यामध्ये कोणताही वैयक्तिक प्रकारचा स्वार्थ नसतो. तसेच त्या नोटरी कागदपत्रांमध्ये नोटरींना कोणताही आर्थिक लाभही नसतो. तरीदेखील नोटरींवर सर्रासपणे भादवी कलम 420 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल होत आहेत कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता काही ठिकाणी असे गुन्हे दाखल झालेले आहेत .नोटरी वकीलांवर अशा संदर्भात गुन्हे दाखल करताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय गुन्हे दाखल अथवा अटक करण्यात येऊ नये. व अशा प्रकारचे परिपत्रक काढण्यात यावे.
हे निवेदन देताना ॲड. सय्यद सिकंदर अली, (अध्यक्ष) महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन),ॲड. अतिश लांडगे (अध्यक्ष – महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन, पिंपरी – चिंचवड, खेड,मावळ ),ॲड. दिनकर बारणे (मा. अध्यक्ष पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशन), ॲड. गोरक्ष लोखंडे (ज्येष्ठ विधीज्ञ), ॲड. शोभा कड ,(महिला अध्यक्ष)ॲड. कांता गोरडे (सचिव नोटरी असो),ॲड. प्रमिला गाडे (महिला सचिव, पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशन)ॲड. प्रसन्ना लोखंडे  आदी उपथित होते.
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares