नीलम गोऱ्हे शिवसेना सोडून चालल्या होत्या, मी थांबवलं त्यांना; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Written by

१९ नोव्हेंबर २०२२
ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे या शिवसेनेत अस्वस्थ होत्या. त्या शिवसेना सोडून निघाल्या होत्या. त्यांना मंत्रिपद मिळत नव्हतं. म्हणून त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. पण माझ्या शिफारशीमुळे त्या थांबल्या आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
नारायण राणे म्हणाले, शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या. शिवसेना सोडून चालल्या होत्या. मी थांबवलं त्यांना. आठवतं का विचारा त्यांना. मी जे बोलतो ते ऐकल्यावर त्यांना आठवेल. ताई नाराज आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.
शाहू सावंत आमच्या जवळचे होते. त्यांच्या मुलाने हॉस्पिटल सुरू केलंय. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मी आलोय, असं नारायण राणे यांनी सांगितलं. सावरकरांच्या विषयावरून भाजपनं राहुल गांधी यांचा निषेध केलेला आहे. बाळासाहेव ठाकरे हे सावरकरांना का मानत होते हे ना आदित्य ठाकरेंना माहीत आहे, ना उद्धव ठाकरेंना, असा टोला राणे यांनी लगावला.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares