निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केलेली कारवाई – माजी उपमहापौर केशव घोळवे

Written by

अतिक्रमण कारवाईमुळे नेपाळी मार्केटचे काही प्रतिनिधी मला भेटण्यास आले. त्यांनी त्यांच्यावर होणारी कारवाईची कैफियत माझ्याकडे मांडल्याचे घोळवे यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्पामुळे त्यांना विस्थापित केले जात आहे. असे त्यांना सांगितले त्यानुसार मनपाचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकरसाहेब यांचेशी चर्चा करुन पुढे मेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा केली व कारवाई स्थगित केली. मेट्रो स्टेशनसाठी नेपाळी मार्केटची जागा लागत आहे अशी मेट्रोनी मागणी केली असता तिथेच या सर्वांना कायमचे विस्थापित करत होते. परंतु तत्कालीन पालकमंत्री मा. गिरीष बापट यांचे सहकार्याने महामेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा करुन यांना सीएसआर अंतर्गत पक्के गाळे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला व ते पुर्ण झालेले आहेत. या मागचा मुख्य ‘उद्देश हाच होता की, शहरामध्ये हॉकर्सचे धोरण अवलंबलेले नाही. यामुळे मुख्य रस्ते, चौक अतिक्रमणाने बाधित झालेले आहेत. त्याचा रहदारीस त्रास होतो व अपघात होतात. त्याबाबत पुढे जावुन मोठे काम करता यावे. मी शहरामध्ये २५ वर्षापासून कामगार क्षेत्रात असंघटीत, संघटीत, शोषित, वंचित, पिडीत, उपेक्षित घटकांचे प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहे फक्त थरमॅक्स कंपनी पुरतेच काम केले नाही तर श्रमिक एकता महासंघाचा सरचिटणिस या नात्याने जिल्ह्यातील १२५ हुन अधिक कारखान्यांमध्ये काम केलेले आहे. अद्यापपर्यंत निष्कलंकच जीवन जगलेलो आहे. माझेवर खंडणी किंवा तत्सम एकही गंभीर आरोप झालेला नाही. परंतु दि. ०१ फेब्रुवारी रोजी चुकीच्या पद्धतीने केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझे चारित्र्यहनन करण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. याचा मी तीव्र निषेध करत आहे. माझेवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला व संपुर्ण महाराष्ट्रभर बातमी परसली. ज्यांचेबरोबर मी काम केलेले आहे त्या सर्वांना हळहळ वाटली व त्यांनी या घटनेचा खेदही व्यक्त केला आहे.
मी कोणालाही नेपाळी मार्केटमधील लोकांकडुन कसल्याही पैशाची मागणी केलेली नाही. धमकावणे तर खुप दुरान्वये आहे. या संपुर्ण षडयंत्रामध्ये पोलीस चौकशीमध्ये पुर्ण सहकार्य केलेले आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मी निर्दोष आहे माझ्याबाबत राजकीय षडयंत्र वापरुन शकुनी चाल केलेली आहे. परंतु या शहरातील तमाम गोरगरीब कामगार गप्प बसणार नाही ते निवडणूकीमध्ये ज्यांनी हे कटकारस्थान केलेले आहे त्यांना त्यांची जागा दाखवतील.
यावेळी पत्रकार परिषदेस महापौर उषा उर्फ माई ढोरे पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हीरा नानी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे , पक्षनेते नामदेव ढाके ,नगरसेवक राजेंद्र गावडे, बाबासाहेब त्रिवभुवन, महिला बालकल्याण समिती अध्यक्षा अनुराधा गोरखे, ज्येष्ठ नगरसेविका झामाताई बारणे , योगिता नागरगोजे शर्मिला बाबर, माधवी राजापुरे उपस्थित होते.

Article Categories:
All News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares