निवडणुकीतून माघार घेण्यासाठी कुणाचा दबाव नाही – मुरजी पटेल

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२

भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतुन माघार घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून ही घोषणा केली आहे. यानंतर भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुरजी पटेल म्हणाले, मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मी दबावामुळे अर्ज मागे घेतला नाही. कोणाचाही माझ्यावर दबाव नव्हता. तसेच, अपक्ष देखील लढणार नाही. पुढील काळात अंधेरीच्या जनतेची सेवा करत राहीन.केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी माघार घ्यायचं ठरवलं. मी तातडीने पक्षाचा आदेश मानला आहे. आम्ही पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहोत. आमच्यासाठी भाजपा आमची आई आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबाबत निराश नाही. तसेच, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही असेही मुरजी पटेल यांनी स्पष्ट केलं.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares