निमगाव सावात महिलांसाठी १०० बेडचे स्वतंत्र शासकीय रुग्णालय करा – पांडुरंग पवार

Written by

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१३ एप्रिल २०२२
निमगाव सावा
निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे महिलांसाठी स्वतंत्र शासकीय १०० बेडचे हॉस्पिटल व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे,आमदार अतुल बेनके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निमगाव सावा हे गाव जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर व पारनेर या तालुक्‍यांना जोडणारे महत्त्वाचे गाव आहे. या भागातील महिलांना वैद्यकीय सेवेसाठी पारनेर,शिरूर,मंचर, नारायणगाव जुन्नर अशा ठिकाणी ३०ते ४० किलोमीटर पर्यंत जावे लागते. वेळेत वाहन उपलब्ध नझाल्यामुळे अनेक दुर्दैवी घटना या परिसरात घडल्या आहेत.गावात हॉस्पिटल झाल्यास तालुक्यातील १०० गावे व अंदाजे ३लाख महिलांना याचा फायदा होणार आहे. व अत्यंत जवळच्या अंतरावर चांगली सोय होणार आहे. यासाठी आवश्यक असणारी शासकीय जमीन देण्यास ग्रामपंचायत तयार आहे. तरी या बाबत कार्यवाही अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares