निधन वार्ता – चतुराबाई सांगळे यांचं निधन

Written by

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२९ एप्रिल २०२२
आष्टी
खडकवाडी (ता.आष्टी) येथील नामांकित पखवाद वादक लहानु सांगळे यांच्या आई चतुराबाई सांगळे (वय ८०) वर्ष यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने निधन झाले.त्यांचा कुटुंबाला मोठा आधार होता. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.प्रगतशील शेतकरी आश्रुबा सांगळे यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. नामांकित पखवाद वादक लहानु सांगळे व सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असणारे बापूसा सांगळे यांच्या त्या आई होत.त्यांचा नातू मच्छिद्र सांगळे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत असून दुसरा नातू रवींद्र सांगळे केंद्रीय पोलीस दलात कार्यरत आहे.त्यांचा दशक्रिया विधी ४ मे रोजी सकाळी आठ वाजता नागतळा येथे होणार आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares